जळगाव

केसीई सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात..

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने आपल्या गुणवत्ता आणि क्षमता यांचा आदर्श खान्देशातील सर्वसामान्य पिढीला देऊन शिक्षित ,सक्षम आणि आत्मनिर्भर केले.८१   वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे ..विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे आता काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.विजय माहेश्वरी यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीच्या  ८१ वा वर्धापन दिनी मनभावन संकुलातील कान्ह कला मंदिर येथे केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष ‍अँड. प्रकाश पाटील,सचिव अँड.प्रमोद पाटील,सहसचिव अँड प्रवीणचंद्र जंगले,कोषांध्यक्ष श्री. डी.टी.पाटील,व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिल्पा बेंडाळे,प्राचार्य अशोक राणे,डॉ.हर्षवर्धन जावळे,श्री.भालचंद्र पाटील ,श्री.संजय प्रभुदेसाई आणि शैक्षणिक संचालक प्रा.मृणालिनी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या १६ शाखांनी एकाच वेळी आपापल्या वाटचालीची माहिती सादर केली. सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन व शैक्षणिक संचालक प्रा.मृणालिनी फडणवीस यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले कि, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार, केसीई सोसायटी आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी केसीई सोसायटीची स्थापनेपासून च्या कार्याचा आढावा घेऊन मागील पाच वर्षांत आयएमआर, इंजिनीअरिंग, मुलांचे वसतिगृह, लॉ कॉलेज आणि ५०० आसन क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह अशा सुविधांची भर पडली आहे असे नमूद केले. या कार्यक्रमात संस्थेचा गौरवशाली इतिहास आणि वाटचाल दर्शवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे आभार सचिव अँड.प्रमोद पाटील यांनी केले .खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित केंद्राने सप्त कलांचा विविध अविष्कार दाखवून  सादरीकरण केले.सोहम योगा सेंटर ,एकलव्य क्रीडा संकुल,एस.एस.मणियार लाॅ कॉलेज,किलबिल बालक मंदिर,जी.पी.वी.पी.शाळा,ए.टी.झांबरे माध्यमिक शाळा,ओरीओन सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल , ओरीओन स्टेट इंग्लिश मिडीयम स्कूल,एम.जे.कॉलेज,कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अॅड मॅनेजमेंट ,आय.एम.आर,स्वामी विवेकानंद जुनियर कॉलेज,कॉलेज ऑफ एजुकेशन अॅड फिजिकल एजुकेशन,अध्यापक कॉलेज,ओजस्विनी कला महाविद्यालय यांनी त्यांच्या ज्ञानशाखांचा परिचय सादरीकरणातून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री भलवतकर आणि मुख्याध्यापक  प्रणिता झांबरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button