
जळगावला नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे; आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली
जळगाव : प्रतिनिधी
राज्य शासनाने मंगळवारी (७ ऑक्टोबर) पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली, तर ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांची जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनात पारदर्शकता व गती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली “शंभर दिवसांचा कृती आराखडा” यशस्वीरीत्या राबवण्यात आला.
रोहन घुगे हे विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. ते लवकरच जळगावचा कार्यभार स्वीकारणार आहेत.