
जामनेर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मंत्री गिरीश महाजन यांची महाविजय सभा
जामनेर प्रतिनिधी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रचाराला जोरदार वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता अराफत चौक येथे महाविजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जलसंपदा विभागाचे मंत्री तथा ज्येष्ठ नेते ना. गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भाजपकडून या सभेद्वारे शहरातील सर्व प्रभागांमध्ये पक्षाची भूमिका, विकासनिती आणि उमेदवारांची कार्ययोजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून उपस्थिती मोठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत जामनेर शहरात पक्षाने दमदार तयारी केली असून प्रचार मोहीम जोरदार सुरू आहे.
वार्ड क्र. 4 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्बु सै. शराफत अली सै. करीम आणि कु. फौजीया फिरदोस शे. जावेद हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..
“सच्चे को चुने, अच्छे को चुने” या घोषवाक्याने या प्रभागातील उमेदवार प्रचार करत असून रविवारच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास भाजप शहराध्यक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून शहरभर प्रचारफेऱ्या, जनसंपर्क मोहीम आणि सोशल मीडियाद्वारे माहिती पोहोचवण्याचे काम सुरू आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत भाजप जोरदारपणे मैदानात उतरली असून आजची सभा निवडणूक वातावरण अधिक तापवणार आहे.




