तुमचे क्रेडीट कार्ड गूगल पे शी लिंक कसे करायचे? पहा सविस्तर माहिती

जळगाव मीडिया प्रतिनिधी: गुगल पे आता रुपे क्रेडिट कार्ड लिंक करण्याची सुविधा देत आहे. यामुळे वापरकर्ते आता त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारेही UPI व्यवहार करू शकतात. ही सुविधा आता सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँकांमध्ये उपलब्ध आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, पीएनबी यांसारख्या बँकांकडून हे कार्ड जारी केलं जातं. UPI व्यवहारांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कारण मोबाईलसोबत हे व्यवहार सहज शक्य होतात. यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या अॅप्सचा मोठा वाटा आहे. आधी बहुतांश लोक डेबिट कार्डच वापरत होते, पण आता क्रेडिट कार्ड लिंक करून देखील UPI पेमेंट करता येत आहे.
जर तुमच्याकडे रुपे क्रेडिट कार्ड असेल, तर ते Google Pay अॅपमध्ये लिंक करून तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन खरेदीसाठी वापरू शकता.हे कार्ड गुगल पे मध्ये कसे लिंक करायचे यासाठी खालील पद्धत अनुसरा.
सर्वप्रथम, तुमच्या अधिकृत Gmail आयडीसह Google Pay वर नोंदणी करा. त्यानंतर अॅप उघडा आणि प्रोफाइल चित्रावर क्लिक करा. पेमेंट पद्धती या पर्यायावर जा आणि रुपे क्रेडिट कार्ड जोडा हे निवडा. त्यानंतर तुमची बँक निवडा आणि कार्डची माहिती (कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, समाप्ती तारीख) भरा. नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे प्रमाणीकरण करा. त्यानंतर UPI पिन सेट करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर, तुम्ही QR कोड, UPI आयडी किंवा मर्चंट हँडल वापरून सुरक्षित आणि सोपे व्यवहार करू शकता.