शासकीय

लाडकी बहीण योजना : नवीन फॉर्म भरण्याला सुरुवात , पहा सविस्तर माहिती

जळगाव मीडिया प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेल्या लाडकी बहीण योजना साठी एप्रिल महिन्याचा, म्हणजेच दहावा हप्ता, लवकरच वितरित होणार आहे. यासोबतच ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे – सरकार लवकरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे.

योजना आणि निवडणूक जाहीरनाम्यातील वचने
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले होते की, विजयानंतर महिला लाभार्थींना 2100 रुपये मासिक सहाय्य दिले जाईल. तसेच, ज्यांनी पूर्वी अर्ज केला नाही त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली जाईल, असेही सांगण्यात आले होते.
नवीन अर्ज कधी सुरू होणार?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मंत्रिमंडळामध्ये यासंदर्भात निर्णय घेऊन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी आपल्या कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे आहे. ज्यांनी पूर्वी अर्ज केला नाही, त्यांना आता अर्ज करण्याची संधी मिळणार.

मात्र ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.

योजनेची अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in

राजकीय संदर्भात योजनेचे महत्त्व
विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी निर्णायक ठरली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आघाडीवर असतानाही विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला बहुमत मिळवून देण्यात या योजनेचा मोठा वाटा होता.

अर्थसंकल्पातील अपेक्षा आणि निराशा
मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये या योजनेसाठी हप्ता वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे काही लाभार्थींमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले की, सरकारची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपयांचा हप्ता सुरू केला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button