
कु. पूर्वा ठाकूर यांचा भाजपमध्ये प्रवेश
सम्राट नगर परिसरात भाजप महिला शाखेचे उद्घाटन
जळगाव प्रतिनिधी सम्राट नगर परिसरात भाजप महिला शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात अवघ्या २३ वर्षांच्या कु. पूर्वा ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून युवा शक्तीला राजकारणात नवी दिशा दिली. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत युवा व महिला नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. कु. ठाकूर यांचा प्रवेश हा युवा नेतृत्वाला मिळणारा मोठा मंच मानला जात असून स्थानिक राजकारणात त्यांच्या सहभागामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा नितू ताई परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




