भाजप सदस्य नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा : गिरीश महाजन
भाजपची संघटनात्मक बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी I भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर पूर्व ,पश्चिम ,व जिल्हा महानगरची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ब्राह्मण सभा येथे दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा ना गिरीश महाजन भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख रवी अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये ना. गिरीश महाजन यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे व मोठ्या संख्येने प्रदेशाने दिलेल्या सदस्य नोंदणी अभियाना मध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियान करून आपल्या जळगाव जिल्ह्याचे एक नंबर स्थान पुन्हा एक वेळेस प्राप्त करावे व यात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी आपल्याला दिलेले 31 जानेवारी पर्यंत आपले टार्गेट पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले, या प्रसंगी प्रदेश संघटन मंत्री विजय चौधरी उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख रवी अनासपुरे आ सुरेश भोळे राजू मामा ,खा स्मिताताई वाघ, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या बैठकीला दोघे लोकसभा क्षेत्रातील तसेच संघटनात्मक तिन्ही जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी नगरसेवक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते