जळगावराजकारणशासकीय

पुण्याच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 14वी भारतीय छात्र संसद

पुण्याच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान 14वी भारतीय छात्र संसद

यूपी विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय 14वीं ‘भारतीय छात्र संसद’ दि.8 ते 10 फेब्रुवारी राेजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, काेथरूड, पुणे येथे हाेणार आहे, अशी माहिती जळगाव शहराचे आमदार सुरेश भाेळे, सिनेट सदस्य तथा माजी महापाैर विष्णू भंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनाेज पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष तथा भारतीय छात्र संसदचे राष्ट्रीय विद्यार्थी सम्नव्यक विराज कावडीया, युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे उपस्थित हाेते.
14 व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, शनिवार, दि.8 फेब्रुवारी 2025 राेजी सकाळी 10.30 वाजता हाेईल. केंद्रीय कामगार आणि राेजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डाॅ.मनसुख मांडवीय व सीएमओ बीओएटीचे सह संस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
तसेच साेमवार, 10 फेब्रुवारी 2025 राेजी दुपारी 11.45 वा. होणाऱ्या समाराेप प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह ताेमर हे उपस्थित राहणार आहेत.
छात्र संसदेच्या उद्घाटन व समाराेप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये 4 सत्रे आयाेजित केली गेली आहेत. संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
सत्र 1 : भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर.
सत्र 2 : रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार
सत्र 3 : भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची काेंडी
सत्र 4 : एआय आणि साेशल मिडिया : सामर्थ्य की अनपेक्षित संकट
याशिवाय लाेकशाहीचा रंगमंच व विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयाेजन केले गेले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या छात्र संसदेत बिहार विधान परिषदचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह, एनएसयूआयचे प्रभारी डाॅ. कन्हैया कुमार, माजी मंत्री नवज्याेत सिंग सिद्धू, खासदार राजकुमार राैत, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, झारखंड विधानसभेचे सभापती रवींद्र नाथ महाताे, काॅग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, खासदार रणजीत रंजन, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, बिहार विधानसभेचे अध्यक्ष नंद किशाेर यादव, लाेकसभा सदस्य अरुण गाेविल, प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर, मेघालय विधानसभेचे सभापती थाॅमस ए. संगमा, तेलंगणाचे आमदार के.टी.रामाराव, माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंग, केंद्रीय मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया आणि खासदार विवेक ठाकूर, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती अ‍ॅड.राहुल नार्वेकर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कामकाम मंत्री चंद्रकांत पाटील, लाेकसभेचे माजी सभापती पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्याेग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणाऱ्या या 14व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्राेत्यांना संबाेधित करणार आहेत.
जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डाॅ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा.डाॅ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लाेबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संताेष हेगडे, डाॅ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डाॅ.राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट— राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लाेकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्काे अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद हाेत आहे.
नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद आणि भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, असाेशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नाेंदवावे.
आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदारांकरीता ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’ 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान काेथरूड, पुणे येथील डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर हाॅल मध्ये हाेणार आहे. या परिषदेत देशातील जवळपास 250 आमदारांनी उपस्थित राहण्याची संमती दर्शविली आहे. या वर्षी आयाेजित नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रमात’ सहभागी सर्व आमदार हे भारतीय छात्र संसद मध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
येथे आमदारांसाठी सुद्धा विशेष 3 सत्रांचे आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये
सत्र 1 : राेजगाराचे मार्ग मतदारसंघात निर्मिती
सत्र 2 : कायदेकर्त्या आणि नाेकरशहाः विकासाचे एजंट
सत्र 3 : धाेरणात्मक संवादः साेशल मीडियाचा प्रभावी वापर

अधिक माहितीसाठी विराज कावडीया राष्ट्रीय विद्यार्थी सम्न्वयक भारतीय छात्र संसद माे.नं. 94222 22699 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button