
जळगाव शहरातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक
दोन बुलेट मोटारसायकल हस्तगत ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील बाबा नगरातील रहिवाशी हर्षद नागपाल यांची बुलेट चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवरून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहे.त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार किशोर पाटील यांनी सिंधी कॉलनी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे जावेद शेख चांद रा मास्टर कॉलनी आणि अदनान अमजद खान शाहूनगर या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे 22 फेब्रुवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता 24 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांनी सिंधी कॉलनी येथील हर्षद दिलीप कुमार नागपाल यांची बाबा नगर येथील घरासमोरून 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेदहा ते साडेपाच वाजेच्या सुमारास बुलेट चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दोन्हीसंशयितांची चौकशी केली असता त्यांनी मास्टर कॉलनी येथून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आले आहे.
हि कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके ,पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे ,पोलीस नाईक किशोर पाटील ,योगेश बारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील ,राहुल घेटे, आदींच्या पथकाने केली .