
गांजा तस्कराला १९ किलो गांजासह ठोकल्या बेड्या
कासोदा पोलिसांनी वेषांतर करून केली कारवाई
कासोदा प्रतिनिधी
कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेवली होती . मात्र पाचव्या दिवशी गांजा तस्कराला वनकोठे गावाजवळ पकडण्यात आले.गांजा आणि मोटारसायकल असा २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय रविंद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गेल्या पाच दिवसांपासून वेशांतर करून गांजा विक्रेत्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. पहिल्या चार दिवसांत कोणतेही यश मिळाले नाही. मात्र, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी गस्त घालतांना वनकोठे गावाजवळ एरंडोलहून कासोदा दिशेने येणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका संशयित व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आरोपी अजय पवार याला अडवून चौकशी करून तपासणीत
गोणीत खाकी रंगाच्या टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे आढळले. त्यांची तपासणी केली असता १९ किलो गांजा आढळला.
असा १९ किलो गांजा आणि मोटारसायकल असा दोन लाख ८० हजारांचा मुद्देमाल आरोपी अजय रविंद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल)यांच्याकडून जप्त करण्यात आला. पोहेकॉ. नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत पोउनि दत्तू खुळे पोहेकॉ नंदलाल परदेशी पोना अकील मुजावर, किरण गाडीलोहार, नरेंद्र गजरे पोकॉ समाधान तोंडे, लहु हटकर या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश राजपूत करत आहेत.