निंबाच्या झाडावर कार आदळली; चार जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

निंबाच्या झाडावर कार आदळली; चार जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोलीजवळ भीषण अपघात
यावल (प्रतिनिधी) – बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाजवळ शनिवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. गुजरातहून भुसावळकडे लग्न समारंभासाठी निघालेली हुंडाई कार (क्र. GJ-05-JE-8071) रस्त्यावर कोसळलेल्या मोठ्या निंबाच्या झाडावर आदळली.
या दुर्घटनेत कारमधील चार जण जखमी झाले असून, एकाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी सर्व व्यक्ती गुजरातमधील रहिवासी असून, त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेने महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभे केले आहेत. जीवंत झाड मध्यरात्री अचानक रस्त्यावर कोसळल्याने वृक्षतोडीच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रीत झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी परिसरात अवैध लाकूडतोडीचा संशय व्यक्त केला आहे.