जळगाव ::- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून 9 लाख 86 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात २६ वर्षीय तरूण हा आपल्या परिवारासह राहायला असून तो उच्चशिक्षित बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात असताना एक डिसेंबर रोजी त्याला मेलवरून भाषा मुखर्जी नावाच्या व्यक्तीने मेल व मोबाईल वरून संपर्क साधून त्या तरुणाला चांगली नोकरी मिळवन देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँकांमध्ये नऊ लाख 86 हजार रुपये रक्कम स्वीकारले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत तरुणाने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन १ जानेवारी रोजी संशयित भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे करीत आहे.