
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, ६ डिसेंबर रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या स्मरणार्थ डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
आझाद समाज पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अक्षय गोयर आणि योगेश तायडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात सामील झाले होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या योगदानाचा उल्लेख करत सामाजिक समतेचे मूल्य आजही तितकेच सक्रियपणे पाळण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन संविधानातील मूलभूत अधिकार, मानवधिकार आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.




