यशात सातत्य ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न व मेहनत आवश्यक – प्रा. व. पू. होले
डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात गा
जळगाव प्रतिनिधी :- येथील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन “जल्लोष २०२४-२५” चे उद्घाटन क.ब. चौ. उमवीच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी लेवा एज्युकेशन युनियन संस्थेचे सचिव प्रा.व. पु होले अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य डॉ. व्ही. जे पाटील, व पी.एन.तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्य श्रीमती सुनीता पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. ए. पी. सरोदे उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटक डॉ.सुरेखा पालवे यांनी “स्नेहसंमेलनास श्रावणातील हिरवळ” असे संबोधित करून शिक्षणासोबत एखादी कला व छंद जोपासणे हे अडचणीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच विद्यार्थिनी या सावित्रीच्या लेकी आहेत त्यांनी शैक्षणिक उन्नती व आपल्या स्वप्नांना बळ मिळण्यासाठी मेहनत केली पाहिजे अशा संदेश दिला.
स्नेह संमेलन निमित्ताने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष लेवा एज्युकेशन युनियनचे सचिव प्रा. व. पु. होले यांनी यशात सातत्य ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न व मेहनत करणे आवश्यक आहे असे म्हटले. तसेच ज्या विद्यार्थिनी वर्षभर प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांना पारितोषिक मिळते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. सलोनी दिलीप मावची तर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. सृष्टी उज्वल शुक्ला तसेच स्नेहसंमेलन सचिव कु. तेजल दीपक पाटील व रागिनी सतीश सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलन निमित्ताने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनीं चित्रकला, मेहंदी, रांगोळी, विविध कलाकुसरीचे वस्तूंचे प्रदर्शन यात उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच विविध छंद कला स्पर्धा प्रकारात रांगोळी, क्राफ्ट ,फूड फेस्टिवल, विविध मनोरंजनाचे खेळ ,ब्युटी आणि फॅशन कॉन्टेस, मध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला तसेच याप्रसंगी विविध कला गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात उद्घाटक डॉ. सुरेखा पालवे मॅडम व कार्यक्रमाचे अध्यक्ष व . पु. होले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना विविध पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी स्वागत पर मनोगतात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी विद्यापीठ परिक्षेत्रात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे हे पहिले स्वायत्त महिला महाविद्यालय म्हणून पाऊल टाकीत नवीन कौशल्यावर आधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. ए.पी. सरोदे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा उंचावलेला आलेख आपल्या मनोगतातून मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांच्या परिचय प्रा. डॉ. स्मिता चौधरी यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे आभार कु. तेजल पाटील हिने केले.