जळगाव जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकारांना केले सन्मानित
जळगाव : प्रतिनिधी कालच्या आणि आजच्या पत्रकारितेत जमीन-अस्मानचे अंतर आहे.पत्रकारितेतील आधुनिकीकरणामुळे मराठी पत्रकारितेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासन आणि पत्रकारांची योग्य सांगड घातली तर राज्यासह देशाच्या विकासाला गती देण्यास मोठा हातभार लागेल,्असा विश्वास नागपूरचे माहिती व जनसंपर्क संचालक गणेश मुळे यांनी पत्रकारदिनी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना व्यक्त केला.
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे येथील पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गणेश मुळे यांनी …प्रशासन आणि पत्रकारिता… या विषयावर प्रबोधन करतांना,पत्रकारांनी पत्रकारितेची विश्वासार्हता जपत विकास कामांना चालना देण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आजच्या पत्रकारितेत आपला टिकाव कसा लागेल हा चिंतनाचा विषय ठरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विकास कामांना प्रकाशझोतात आणणे हा समाज हिताचा एक भाग मानला गेला पाहिजे.मराठी पत्रकारितेते विश्लेषण हा जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत मराठी पत्रकारितेला अमरत्व आहे असेही त्यांनी पटवून दिले.
प्रशासन व पत्रकारिता यांनी विधायकदृष्टी ठेवून काम केले तर अनेक समाजहितोपयोगी प्रकल्प मार्गी लागू शकतात असा आत्मविश्वासही श्री.मुळे यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील हे होते.प्रारंभी वर्षभारातील दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली व त्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला.
ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने हेमंत काळुंखे,्अनंत वाणी,शिवलाल बारी,पांडुरंग महाले,मुकुंद एडके,सुरेश चौधरी, योगेश वाणी,शांताताई वाणी,केदारनाथ दायमा,अरुण मोरे,बी.एस.चौधरी(एरंडोल),विश्वास चौधरी,बापूसाहेब वाडिले(पारोळा),उमाकांत वाणी,शब्बीर सय्यद,प्रकाश पत्की,संजय निकुंभ,नंदु नागराज,तेजमल जैन(जामनेर) आदिंचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात विजयबापू पाटील यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा सादर करुन अनेक वर्षापासूनची पत्रकार संघाच्या कार्याची परंपरा कायम ठेवल्याचे स्पष्ट केले.पत्रकारांच्या समस्या व प्रश्न धसास लावण्यासाठी नेहमीच जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेऊन लढ्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हिरक महोत्सवी वर्षात पत्रकारहिताचे अनेक उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक सन्मानाने गौरव
यावेळी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करीत असल्याबद्दल पांडुरंग हरी पाटील,विक्रम पाटील ,वैद्य उदय तल्हार,मधुकर ठाकूर व ओम साईराम गृप (सर्व कासोदा) यांना सामाजिक सन्मानाने गौरवण्यात आले.व्यासपिठावर आ.राजूमामा भोळे, जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,भिकाभाऊ चौधरी,सचिन सोमवंशी,मुकुंद एडके, पांडुरंग महाले, राजेश यावलकर,फारुख शेख,महानगराध्यक्ष विवेक खडसे आदी होते.
पत्रकार संघाचे सरचिटणीस दिलीप शिरुडे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार भवन समितीचे सचिव सारंग भाटिया यांच्यासह,विवेक खडसे,पांडुरंग महाले, आदींनी परिश्रम घेतले.
आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
जिल्हा पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघ, मुक्ती फाउंडेशन व रेडक्रॉस सोसायटीतर्फे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात हृदयरोग, रक्तदाब ,मधुमेह, जनरल तपासणी, रक्तगट तपासणी, दंत तपासणी, रक्तदान शिबिरही झाले.
अनेक पत्रकारांनी स्वयंस्फूर्त लाभ घेतला. कार्यक्रमास आरोग्य विभाग प्रमुख, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, अस्थीरोग तज्ञ डॉ.नितीन धांडे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.ए.डी.चोधरी तंत्रज्ञ राजेंद्र कोळी,किरण बावस्कर,आर.एल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. अनिरुद्ध पवार,डॉ.जूनेशा मेलवाणी,स्वप्निल पालवे, श्रद्धा डेंटल क्लिनिकच्या डॉ.वैशाली पुरी यांचे विशेष सहकार्य लाभले.