जळगाव

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील

        जळगाव ;- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील

यांनी केले.

शुक्रवार, 31 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,लीड बँक व्यवस्थापक प्रणव झा, कौशल्य विकास सहआयुक्त संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज द्यावे

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध जातींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यभरात जातनिहाय महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

नरेंद्र पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. बँकांनी अधिकाधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करावे व त्यांना नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याव्यात.

राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे आवाहन केले.या बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button