जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार पोलीस उपनिरीक्षक आज 31 रोजी सेवानिवृत्त झाले असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते यांचा सन्मान करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.
चार पोलीस उपनिरीक्षक हे आज सेवानिवृत्त झाले असून त्यात पोलीस मुख्यालयातील सुनील लक्ष्मण वडनेरे, वरणगाव पोलीस स्टेशन येथील अनिल भानुदास चौधरी, फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शरद जगन्नाथ शिंदे, निंभोरा पोलीस स्टेशन येथील राजेंद्र काशिनाथ पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला.
यावेळेला सर्व पोलीस उपनिरीक्षक यांचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. . डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व उपनिरीक्षकांच्या कार्याचे कौतुक करूनचारही पोलीस उपनिरीक्षकांच्या सेवेला सलाम करतो अशा शब्दात पोलीस अधीक्षक डॉ. महाश्वेरी रेड्डी यांनी कौतुक केले. या सेवानिवृत्त निरोप प्रसंगी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.