पाळधी ता. धरणगाव येथे पाळधी व धरणगाव येथील पोलिसांनी शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने रूट मार्च काढला.
पाळधी येथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या जाळपोळ नंतर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त अद्यापही कायम ठेवण्यात आला आहेगावात दोन दिवसांचा संचारबंदी नंतर आता शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने पाळधी व धरणगाव येथील पोलिसांकडून मंगळवारी संध्याकाळी पाळधी बुद्रुक व खुर्द अशा दोन्हा गावातून रूट मार्च काढला. यात दंगा नियंत्रक पथकाचा देखील सामावेश होता. या वेळी पोलिसांनी गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या प्रसंगी धरणगावचे पो. नि. पवन देसले, स. पो. नि. प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.