देवास प्रतिनिधी :– देवास येथे सुरू असलेल्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत १९ वर्षे आतील मुलांमध्ये सरदार जी जी हायस्कूल रावेर तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा दानिश रहेमान तडवीला रौप्य पदक
जळगांव :- मध्य प्रदेश शासन व स्कूल शिक्षा विभाग, जिल्हा देवास, येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज झालेल्या १९ वर्षे आतील मुलांमध्ये ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी याने रौप्य पदक पटकावले त्याने पहिल्या फेरीत झारखंड चा खेळाडू दिपक कुमार यास २२ – ०९ , १२ – ० ने हारवले, दुस-या फेरीत वेस्ट बंगालच्या जित शाॅ ला २४-१७, २२-१० च्या फरकाने नमवले, तिसऱ्या फेरीत उत्तराखंड चा राॅबिन सिंग याला २० -०८, १४-०१ ने मारून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, सेमी फायनल मध्ये त्याने बिहार चा प्रिन्स कुमार यास २६-१७, २२- १४ च्या फरकाने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला, फायनल मध्ये त्याला मध्य प्रदेश चा अभय दुगुर याच्या सोबत १६-१८, २२-२३ या गुण फरकाने पराभव पत्करावा लागला व रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दानिश रहेमान तडवी हा सरदार जी जी हायस्कूल रावेर तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू असुन त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर ( एन.आय.एस. डिप्लोमा ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे सरदार जी जी हायस्कूल चे सर्व शिक्षकवृंद आदिनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या