जळगावराजकारणसामाजिक

जळगावात भाजपची संघटनात्मक फेरबदल : नवे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष जाहीर

जळगावात भाजपची संघटनात्मक फेरबदल : नवे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष जाहीर

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l१३ मे २०२५ l आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यातील संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल घडवत आज नव्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची घोषणा केली. यात जळगाव जिल्ह्याला विशेष महत्त्व देण्यात आले असून, दोन्ही जिल्हाध्यक्षपदे आणि महानगराध्यक्षपदावर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सामाजिक समतोल राखत पक्षाने मराठा आणि गुजर समाजातील कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्वसमावेशक नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे.जळगाव पूर्वला चंद्रकांत बाविस्कर, पश्चिमला डॉ. राधेश्याम चौधरीजळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे बाविस्कर यांनी तालुकाध्यक्षपदी यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या अनुभवाला पाठबळ देत पक्षाने त्यांना जिल्हा पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड झाली आहे. माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख असलेले डॉ. चौधरी यांनी पक्षासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम भागातील पक्षसंघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.दीपक सूर्यवंशी यांच्यावर पुन्हा महानगराध्यक्षपदाची जबाबदारीजळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या प्रभावी कार्यप्रदर्शनावर पक्षनेतृत्वाने विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरात पक्षाने अनेक यशस्वी उपक्रम राबवले असून, आगामी निवडणुकीतही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.सामाजिक समतोल आणि निवडणूक तयारीभाजपने सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने दोन मराठा आणि एका गुजर समाजातील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षपद देऊन विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले आहे. पक्षाच्या या रणनीतीमुळे सर्व समाजघटकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हे संघटनात्मक फेरबदल महत्त्वपूर्ण ठरणार असून, जळगावात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button