
जळगाव जिल्ह्यातील 14 पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या
जळगाव l प्रतिनिधी l जिल्ह्यात 14 पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) प्रभारी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वीच त्यांनी एलसीबीची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, नुकत्याच चर्चेत आलेल्या ड्रग्ज आणि गुटखा प्रकरणांमुळे त्यांच्या बदलीची चर्चा पोलिस दलात रंगली आहे. दुसरीकडे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
बदल्यांची यादी खालीलप्रमाणे:
– बबन आव्हाड: एलसीबी → एमआयडीसी
– संदीप पाटील एमआयडीसी → एलसीबी
– कावेरी कमलाकर: चोपडा ग्रामीण → शनी पेठ
– दत्तात्रय निकम: शनी पेठ → अमळनेर
– रंगनाथ धारबळे: अमळनेर → यावल
– प्रदीप ठाकूर: यावल → जिल्हा पेठ
– सुनील पवार: पारोळा → नियंत्रण कक्ष
– प्रमोद कठोरे: आर्थिक गुन्हे शाखा → पहूर
– जनार्दन खंडेराव: वरणगाव → यावल
– अमितकुमार बागुल: भुसावळ बाजारपेठ → वरणगाव
– प्रकाश काळे: पिंपळगाव हरेश्वर → जळगाव शहर
– कल्याणी वर्मा: जळगाव शहर → पिंपळगाव हरेश्वर
– सोपान गोरे: पाचोरा → एलसीबी