गुन्हेराष्ट्रीयसामाजिक

110 च्या स्पीडने बुलेट चालवणाऱ्या तरुणाचा भीषण अपघात ; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

110 च्या स्पीडने बुलेट चालवणाऱ्या तरुणाचा भीषण अपघात ; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या सोशल मीडियावर एक भीषण अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, तो पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये एक तरुण अतिवेगाने बुलेट दुचाकी चालवत असल्याचे दिसत असून, काही क्षणांतच त्याचा ताबा सुटून भीषण अपघात घडतो. हा व्हिडीओ इतर वाहनचालकांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे.

https://www.instagram.com/reel/DJzcVsTPP4H/?utm_source=ig_web_copy_link

एक काळ असा होता की, बुलेटचा आवाज म्हणजे दूधवाला आला, अशी साधी ओळख होती. मात्र आता बुलेट ही तरुणाईची क्रेझ बनली आहे. या महागड्या आणि वजनदार गाडीने कॉलेजपासून रस्त्यांपर्यंत तरुणाईला वेड लावले आहे. रुबाबदार दिसण्यासाठी अनेक तरुण यावर वेगाने स्वार होताना दिसतात. परंतु हेच वेड जीवावर बेतू शकते, याचे वास्तव पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण तब्बल 110 किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट चालवत असल्याचे दिसते. वेगाचा थरार अनुभवत असतानाच अचानक नियंत्रण सुटते आणि तो जोरात ब्रेक मारतो. मात्र तेव्हाच त्याचा अपघात होतो आणि तो रस्त्यावर फेकला जातो. हा क्षण इतका भयावह आहे की, हा व्हिडीओ पाहणाऱ्यांचेही काळजाचे ठोके चुकतात.

अनेकदा अशा अपघातांचे कारण चालकाचाच बेजबाबदारपणा असतो. जर चालकाने संयम बाळगला आणि वेगावर नियंत्रण ठेवले, तर असे अपघात टाळता येऊ शकतात. दुर्दैवाची बाब म्हणजे, अशा अपघातांमध्ये फक्त चालकाचेच नव्हे, तर इतर निरपराध लोकांचेही नुकसान होते. सोशल मीडियावर दररोज अशा असंख्य घटना पाहायला मिळतात – काही मनोरंजक असतात, तर काही डोळ्यांत अंजन घालणाऱ्या.

हा व्हिडीओ केवळ एक थरारक घटना नसून, वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचा गंभीर संदेश देतो. वाहन चालवताना शिस्त आणि सावधगिरी आवश्यक आहे, हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button