सिंगर मल्टिपर्पज फाऊंडेशन जळगाव तर्फे गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप
जळगाव मीडिया ( प्रतिनिधी ) सिंगर मल्टिपर्पज फाउंडेशन आयोजित स्कूल चले हम हे कार्यक्रम दि.15 अगस्त 2024 रोजी सरदार वल्लभ भाई पटेल हॉल आंबेडकर मार्केट जवळ जळगांव येथे आयोजित केले होते गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी मोफत दुचाकी सायकल वितरित करण्यात आले प्रमुख पाहुणे मा.आ.श्री राजु मामा भोले, मा.श्री डॉ.शांताराम दादा सोनावणे, मा.श्री मजीद झकेरिया , मा.श्री विष्णु भाऊ भंगाळे , मा.श्री डॉ.शेषराव परमार मा. आयुक्त आणि उप. आयुक्त म. न.पा.जळगाव हे उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले मा.आ.राजु मामा , डॉ. शांताराम सोनवणे, मजीद झकेरिया ,विष्णु भाऊ भंगाळे यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील 100 गरजू विद्यार्थ्यांची निवळ करण्यात आली होती तरी 25 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात हे सायकल वाटप करण्यात येणार आहे… स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ऑर्केस्ट्रा सदाबहार जळगावच्या गायक कलावंतांनी देशभक्ती गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशन चे अध्यक्ष हाफिज शेख,विलास घुळे संदीप माळोदे,प्रदीप सपकाळ,सोनाली भोई इत्यादींनी परिश्रम घेतले.