
घरफोडी करणाऱ्या एकाला अटक; चाळीसगाव पोलिसांची कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी I एका घरातून तीस हजार रुपये किमतीचे दागिने लांबविणाऱ्या एका चोरट्याला चाळीसगाव पोलिसांनी केली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कृष्णानगर (तळेगाव) येथील अंगणवाडी सेविका सरलाबाई साईदास चव्हाण यांच्या सासूचे सोन्याचे दागिने घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्याने घरातून पेटीतील ३० हजाराचे ३ ग्रॅम सोन्याचे पदक व ४ मणी असा ऐवज चोरुन नेला होता. सरलाबाई चव्हाण यांच्या घरासमोर राहणाऱ्या भाईदास प्रल्हाद चव्हाण (वय २८) याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास पोलीस ठाण्यात आणले.
त्याने चोरीची कबुली देत ३० हजाराचा ऐवज काढून दिला. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. ही कारवाई पो. नि. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार युवराज नाईक, हवालदार गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, पोलीस नाईक तुकाराम चव्हाण, संदीप पाटील यांनी केली.