गुन्हेजळगावसामाजिक

एमआयडीसी पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी; नाशिक विभागात मिळवला प्रथम क्रमांक

एमआयडीसी पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी; नाशिक विभागात मिळवला प्रथम क्रमांक

जळगाव | १८ मे २०२५
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या सुधारणा कृती कार्यक्रमात जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामुळे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन व्यवस्थापन, स्वच्छता, तक्रार निवारण, नागरिकांसाठी सोयी-सुविधा, तांत्रिक सुधारणा अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याने हे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले.

या मोहिमेंतर्गत ठाण्याने १००% वेळेत पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी सेवा दिली. त्यासोबतच स्वच्छता मोहीम, जुने मुद्देमाल निकाली काढणे, रेकॉर्ड अद्ययावत करणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच ‘एक सत्र विद्यार्थ्यांसाठी’, ‘एकता होळी’ यांसारखे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट अंमलदारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखलही घेण्यात आली.

या योजनेत दुसरा क्रमांक कोतवाली पोलीस ठाणे (अहिल्यानगर, ) आणि तिसरा क्रमांक पश्चिम देवपूर पोलीस ठाणे (धुळे) यांनी मिळवला आहे.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील म्हणाले, “वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य या यशामागील मुख्य कारण आहेत. आम्ही नागरिकाभिमुख आणि कार्यक्षम पोलीस ठाणे घडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्याचेच हे फलित आहे.”

या सन्मानामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याने आपल्या कार्यक्षमता आणि बांधिलकीचा ठसा उमठवला असून, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button