जळगावराजकारण

जळगाव भाजप अल्पसंख्यक मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न; संघटन मजबुतीवर भर 

जळगाव भाजप अल्पसंख्यक मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न; संघटन मजबुतीवर भर 

परवेज खान पठाण व दीपक सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन; कार्यकर्त्यांना संघटन बळकटीचे आवाहन

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा जळगाव महानगराची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महानगर अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी तसेच नवनिर्मित जिल्हा महानगर अध्यक्ष परवेज खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आगामी नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक जाकीर दादा पठाण, सुरेश भाऊ सोनवणे, अतुल भाऊ बारी यांच्यासह पत्रकार व अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष वसीम खान उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष अश्फाक खाटिक, वसीम शेख, शैलेंद्र परदेशी, जब्बार खान, दीपक परदेशी, इरफान शेख, लियाकत खान, इद्रिस भाई यांचाही सहभाग लक्षणीय ठरला. सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात येऊन त्यांनी संघटन कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांनी अल्पसंख्यक समाजातील अधिकाधिक नागरिकांना पक्षाच्या विचारसरणीशी जोडण्यावर भर देत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आसिफ सलीम तडवी, हसन शेख, आमिर सय्यद, कलीम पटेल, रविंद्र पाटील, इरफान जे. शेख, दानिश शेख, शाकीर खान, हाशिम बागवान, रेहान रजा, आबिद खान, सलमान खान, निजाम खान, असलम खान, मोहसीन शाह, प्रकाश भंगाळे, तहसील पिंजारी, अरबाज खान, शोएब शेख, शाहिद खान, अजीम शेख, हुसेन भाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button