शैक्षणिकसामाजिक

टीपू सुलतान जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; हजरत उमर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

जळगाव मीडिया न्यूज़ नेटवर्क : टीपू सुलतान जयंतीनिमित्त हजरत उमर फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी उपमहापौर डॉ. करिम सालार साहेब, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित साहेब, डी.वाय.एस.पी. नितीन गणापुरे साहेब, पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड साहेब, माजी उपमहापौर सुनीलभाऊ महाजन, जिल्हा चिटणीस पितांबर भावसार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र पोलीस न्यूजचे संपादक चेतनभाऊ वाणी, जळगाव मीडिया न्यूजचे संपादक वसीम खान, खान्देश टाइम्स न्यूजचे संपादक जॅकी अहमद, तसेच पत्रकार असलम खान, शाहिर तेली, इमरान खान, शहीद खान यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

हजरत उमर फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या सामाजिक उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळणार असून समाजात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कय्यूम खान, उपाध्यक्ष अहमद खान, सचिव ईस्माईल खान तसेच असलम काकर, जमीलभाई अत्तरवाले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य करीत आहेत.

हजरत उमर फाउंडेशनच्या वतीने नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क | वसीम खान

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button