गुन्हेजळगावसामाजिक

चोरीस गेलेले 17 लाखांचे दागिने फिर्यादीस सुपूर्द!

पहुर. ता. जामनेरः येथील रहिवासी अनिल रिखबदास कोटेचा यांच्या घरातील चोरीस गेलेला १६ लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज (सोने चांदीचे दागिने)  दि. ७ रोजी पहुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अनिल कोटेचा यांच्या ताब्यात देण्यात आला.

दि.२५ ऑगष्ट २०२१ ते २९ ऑगष्ट दरम्यान अनिल कोचेटा हे राजस्थान येथील जोधपुर येथे देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यानी घराचा कडी कोंडा तोडून सोन्याची चैन, अंगठ्‌या, बांगड्या असा १६लाख ९० हजार ५७८ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी सैय्यद हारून (वय २५), अनिल रमेश चौधरी ( वय ४०), सैय्यद आराफत फारुख (वय ३२), सैव्यद अमीन उर्फबुलेट सैव्यद फारुख (वय २१), भावना जवाहरलाल लोडा सर्व रा. जळगांव यांना अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयाने गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ताब्यात मिळणे देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आज योग्य ती कागदोपत्री पूर्तता करून हा मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला आहे, वावेळी पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, बिट अंमलदार विलास चव्हाण, पो. कॉ. गोपाळ माळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button