आरोग्य

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा सामाजिक उपक्रम; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव मीडिया | प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव यांच्या वतीने महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सामाजिक उपक्रम बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी रेडप्लस ब्लड सेंटर (एम. जे. कॉलेज रोड, जळगाव) येथे आयोजित करण्यात आला असून, रक्तदान शिबिराचे ठिकाण गोलाणी मार्केट ग्राउंड फ्लोअर, अग्निशामक दल कार्यालयाच्या बाजूला, दत्त मंदिरासमोर, जळगाव असे आहे.

या कार्यक्रमाला जळगावचे लोकप्रिय आमदार मा. सुरेश दामू भोळे (राजूमामा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शहरातील सर्व नगरसेवक, सर्व मंडळ अध्यक्ष, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष परवेज पठाण, 9766651100, उपजिल्हाध्यक्ष वसीम खान, 9764000907 यांच्याशी संपर्क साधावा

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button