वेश्या व्यवसायावर चोपडा पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालकाला अटक

वेश्या व्यवसायावर चोपडा पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालकाला अटक
धनवाडी शिवारातील गोडाऊनमध्ये सुरू होता अनैतिक व्यवसाय
जळगाव, प्रतिनिधी :
चोपडा शहरालगत धनवाडी शिवारातील एका शेडच्या गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी कुंटणखाना चालविण्याच्या आरोपावरून जगन्नाथ जानकीराम महाजन याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक युवराज वाळुंज आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. धनवाडी शिवारात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.




