जळगाव

जळगाव : छत्रपती शिवाजी नगर पुलावर शिडी-पायऱ्यांचा अभाव; महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांची गैरसोय

जळगाव मीडिया ( वसीम खान ) : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नवीन पुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असली तरी पुलाच्या खाली ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिडी-पायऱ्यांची व्यवस्था न केल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ब्रिटिश काळात असलेल्या जुन्या पुलामध्ये महिला, लहान मुले-मुली तसेच वृद्ध नागरिकांसाठी पायऱ्यांची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सहजपणे पुलावरून जाणे-येणे करता येत होते. मात्र नवीन पूल तयार करताना शिवाजी नगर भागातील रहिवाशांसाठी शिडी किंवा पायऱ्या बनविण्यात आल्या नाहीत.

यामुळे विशेषतः महिला, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांना पुलावर चढ-उतरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा नागरिकांना धोकादायक मार्गाचा वापर करावा लागतो.

नागरिकांची मागणी आहे की, प्रशासनाने तातडीने पाहणी करून नवीन पुलावर नागरिकांच्या सोयीसाठी शिडी-पायऱ्यांची व्यवस्था करावी, जेणेकरून शिवाजी नगर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होईल.

“जुना पूल सुविधा देत होता, नवीन पुलावरही नागरिकांच्या सोयीचा विचार व्हावा” — अशी मागणी शिवाजी नगर रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button