महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ! गुरुवारी धो-धो बरसणार; 31 जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव मीडिया प्रतिनिधी : राज्यातील विविध भागांत 23 आणि 24 जून रोजी जोरदार पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने 25 जूनसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील विविध भागांत 23 आणि 24 जून रोजी जोरदार पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने 25 जूनसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबई येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र आता पेरणीची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून देखील सुटका मिळाली आहे. राज्यात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील विविध भागांत 23 आणि 24 जून रोजी जोरदार पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने 25 जूनसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील विविध भागांत 23 आणि 24 जून रोजी जोरदार पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने 25 जूनसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबई येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र आता पेरणीची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून देखील सुटका मिळाली आहे. राज्यात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




