गुन्हेजळगाव

चाळीसगावात दुकान लावण्याच्या वादातून युवकाची विटेने ठेचून हत्या

चाळीसगावात दुकान लावण्याच्या वादातून युवकाची विटेने ठेचून हत्या

हत्येच्या घटनेने तालुक्यात खळबळ

चाळीसगाव | प्रतिनिधी

दुकान लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात घडली. या प्रकरणात संशयिताने विटेने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून अक्षयचा खून केल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकान लावण्याच्या कारणावरून अक्षय आणि संशयित निखील उर्फ भोला सुनील अजबे यांच्यात वाद झाला होता. या वादातून संशयिताने विटेने अक्षयच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचे वडील भानुदास राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button