जळगावराजकारण

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस!

२१ जागांसाठी १५६ अर्ज दाखल; आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, राजकीय हालचालींना वेग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस!

२१ जागांसाठी १५६ अर्ज दाखल; आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, राजकीय हालचालींना वेग

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी गुरुवारी तब्बल १५६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, संचालक डॉ. सतीश पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आमदार अनिल पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील, आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील, आमदार नंदकिशोर महाजन, माजी महापौर जयश्री महाजन आणि कल्पिता पाटील यांच्यासह अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

२१ जागांसाठी मोठी चुरस

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली. विविध राजकीय गटांतील नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश

गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, मृणाल पाटील, कल्पिता पाटील, उदयसिंग पाटील, विजय पाटील, रामदास पाटील, ज्योती पाटील, पूनम पाटील, सतीश शिंदे, ताराचंद पाटील, संजय पवार, घनश्याम अग्रवाल, नलिनी पाटील, रमेश पाटील, राजीव पाटील, विनोद तराळ, पराग मोरे, इंदिराताई पाटील, तिलोत्तमा पाटील, शोभा पाटील, तनुजा मोरे, चंद्रकलाबाई पाटील, सुलोचना वाघ, मनीषा सूर्यवंशी, निर्मला पाटील, निर्मला महाजन, रोहिणी पाटील, शीतल ढोले, वैशाली पाटील आणि अमृता महाजन आदींचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ७३७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३० नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button