जळगावशासकीय

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानात तडजोडीसाठी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानात तडजोडीसाठी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी महसूल व वनविभागाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात १ सप्टेंबर,२०२६ ते ३१ मार्च,२०२७ या कालावधीत “महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपिलांचा समावेश करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध कार्यालयांसाठी महसूल लोक अदालतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. दि.१७ सप्टेंबर,२०२६ रोजी चोपडा, पारोळा, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, जामनेर, यावल, भडगाव, भुसावळ, पाचोरा, जळगाव, बोदवड, रावेर व चाळीसगाव येथील तहसील कार्यालये तसेच पाचोरा, एरंडोल, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव येथील उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रथम महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच ५ ऑक्टोबर,२०२६ रोजी अमळनेर तहसील कार्यालय तसेच फैजपूर व जळगाव उपविभागीय कार्यालयांमध्ये, तर ९ ऑक्टोबर,२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व अपर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रथम महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या अर्धन्यायिक न्यायालयात किंवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित आहे, त्या ठिकाणी दोन्ही पक्षकारांनी त्यांच्या विधीज्ञामार्फत “प्रपत्र-अ” मधील नमुन्यात तडजोडीसाठी संबंधित कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. “प्रपत्र-अ”मधील नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button