म्हसावद येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; ५५ हजारांचा ऐवज लंपास
जळगावः अज्ञात चोरट्यांनी एका ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील चांदीचे दागिने बेन्टेक्स दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेल्याची घटना तालुक्यातील म्हसावद येथे उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसावद गावात दीपक नामदेव सोनार (वय ३९) हे यांचा सोनारी व्यवसाय असून त्यांचे गावामध्ये मरीमाता मंदिराजवळ बिदाई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान २ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान त्यांचे दुकान बंद असताना त्यांच्या दुकानातून ५५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, फॅन्सी बेन्टेक्सचे दागिने आणि ५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला आहे. या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास प्रदीप पाटील करीत आहे.