जळगावशासकीय

जळगावात १९ वार्डांमधून १३६ गोण्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

मनपाची विशेष मोहीम; दर गुरुवारी राबवणार स्वच्छता अभियान

जळगावात १९ वार्डांमधून १३६ गोण्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

मनपाची विशेष मोहीम; दर गुरुवारी राबवणार स्वच्छता अभियान

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या निर्देशानुसार शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. ९ मे रोजी प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १ ते १९ मध्ये ही मोहीम राबवली गेली. यात मुख्य रस्त्यालगतचा प्लास्टिक कचरा गोळा करून एकूण १३६ गोण्या कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा शासकीय नियमानुसार विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आला आहे.

ही मोहीम सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, सर्व आरोग्य निरीक्षक, वार्ड मुकादम आणि सफाई कामगारांनी राबवली. दर आठवड्याला गुरुवारी अशी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button