जळगावच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची आ. राजुमामा भोळे यांची मागणी
मुख्यमंत्री सचिवालयातील बैठकीत एमआयडीसी प्रश्नांवर चर्चा; तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
जळगाव : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी आमदार राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री सचिवालयात झालेल्या बैठकीत मांडली. २२ एप्रिल रोजी विशेष कार्य कक्षांतर्गत झालेल्या या बैठकीत औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबईत आढावा बैठक
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी घाटे तसेच आ. राजुमामा भोळे उपस्थित होते. बैठकीत जळगाव एमआयडीसीच्या विस्तारासह प्रलंबित प्रश्न आणि उद्योजकांच्या अडचणींबाबत मुद्देसूद मांडणी करण्यात आली.
पायाभूत सुविधांवर भर
औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा मजबूत करणे, उद्योगवाढीस गती देणे आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. संबंधित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
रोजगारनिर्मितीस चालना
या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, नव्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



