गुन्हेजळगावसामाजिक

मेहरुण परिसरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

मेहरुण परिसरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : शहरातील मेहरुण परिसरात राहणाऱ्या एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात मृत घोषित
रुपाली मनोज देसले (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

कारण अद्याप अस्पष्ट
आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button