26/11 च्या शहीद जवानांना आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली; मोफत कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क | वसीम खान
मुंबई : मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने हृदयविकारासंबंधी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच पोलीस बांधवांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम कार्यक्रमाचे महत्त्वाचे आकर्षण ठरला.




