गुन्हेजळगाव

पाचोर्यात बालविवाह प्रकरण उघड; पतीसह सासू-सासरे व आई-वडिलांवर पोक्सोचा गुन्हा

पाचोर्यात बालविवाह प्रकरण उघड; पतीसह सासू-सासरे व आई-वडिलांवर पोक्सोचा गुन्हा

पाचोरा | प्रतिनिधी :
पाचोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्या लैंगिक शोषणास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पती, सासू, सासरे तसेच पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही विवाहाच्या वेळी १७ वर्षे १ महिना ९ दिवस वयाची होती. ती अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि सासू-सासऱ्यांनी तिचा विवाह संशयित पतीशी लावून दिला. विवाहानंतर आरोपी पतीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली आणि तिने एका बालकाला जन्म दिला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

पीडितेच्या जबाबावरून ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ दाखल करण्यात आला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(i), ६४(२)(m), ३(५), पोक्सो कायदा २०१२ चे कलम ४, ६, १७ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९ व ११ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी सखोल तपासाचे आदेश दिले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button