जळगावराजकारणसामाजिक

अखेर महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर !

अखेर महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर !

नवीन चेहऱ्यांना संधी ; इच्छुकांची हिरमोड

जळगाव, (प्रतिनिधी) : महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार यादी अखेर फायनल झाली असून, १ ते १९ या सर्व प्रभागांतील अ, ब, क, ड जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. आरक्षणानुसार उमेदवार जाहीर झाल्याने शहरातील राजकीय वातावरण आता तापू लागले असून रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये अ जागेवर भाजपच्या रिटा विनोद सपकाळे, ब जागेवर दिलीप बबनराव पोकळे, क जागेवर संगीता दांडेकर तर ड जागेवर फरदीन फिरोज पठाण हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये अ मधून सागर श्याम सोनवणे, ब मधून उज्वला किशोर बाविस्कर हे शिवसेनेकडून, तर क मधून पूजा विजय जगताप व ड मधून विजय लक्ष्मण बांदल हे भाजपकडून रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ मधून भाजपच्या अर्चना संजय पाटील, ब मधून प्रतीक्षा कैलास सोनवणे, क मधून शिवसेनेचे प्रवीण रामदास कोल्हे तर ड मधून भाजपचे निलेश तायडे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अ मधून भाजपच्या शशीबाई उर्फ शशिकला शिवचरण ढंडोरे, ब मधून विद्या मुकुंदा सोनवणे, क मधून कल्पेश कैलास सोनवणे तर ड मधून शिवसेनेचे पीयूष ललित कोल्हे निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये अ मधून शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, ब मधून मंगला संजय चौधरी, क मधून भाजपच्या आशा रमेश पाटील तर ड मधून नितीन बालमुकुंद लढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये चारही जागांवर भाजपने उमेदवार दिले असून अ मधून जयश्री अशोक धांडे, ब मधून सुचिता अतुलसिंह हाडा, क मधून अमित पांडुरंग काळे तर ड मधून दीपक प्रभाकर सूर्यवंशी निवडणूक लढणार आहेत.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ मधून दीपमाला मनोज काळे, ब मधून अंकिता पंकज पाटील, क मधून विशाल सुरेश भोळे तर ड मधून चंद्रशेखर अत्तरदे हे भाजपचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये अ मधून भाजपच्या कविता सागर पाटील, ब मधून मानसी निलेश भोईटे, क मधून अमर मोतीलाल जैन तर ड मधून शिवसेनेचे नरेंद्र आत्माराम पाटील राजपूत रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ मधून मनोज सुरेश चौधरी, ब मधून प्रतिभा गजानन देशमुख हे शिवसेनेचे उमेदवार असून क मधून भाजपच्या जयश्री राहुल पाटील तर ड मधून डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये अ मधून सुरेश माणिक सोनवणे, ब मधून माधुरी अतुल बारी, क मधून कविता किरण भोई तर ड मधून जाकिर पठाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

प्रभाग क्रमांक ११ हा शिवसेनेकडे असून अ मधून डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, ब मधून संतोष पाटील, क मधून सिंधुताई विजय कोल्हे तर ड मधून ललित विजय कोल्हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपकडून अ मधून अनिल अडकमोल, ब मधून उज्वला बेंडाळे, क मधून गायत्री राणे तर ड मधून नितीन बरडे निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये अ मधून नितीन सपके, ब मधून सुरेखा नितीन तायडे, क मधून वैशाली अमित पाटील हे भाजपकडून तर ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रफुल्ल गुलाबराव देवकर रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ मधून सुनील सुपडू महाजन, ब मधून जयश्री सुनील महाजन, क मधून राबियाबी अमजद खान तर ड मधून रितिक संजय ढेकळे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये अ मधून अरविंद देशमुख, ब मधून चेतन शिरसाळे हे भाजपकडून, क मधून शिवसेनेच्या रेश्मा कुंदन काळे तर ड मधून प्रकाश रावलमल बालानी निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये अ मधून डॉ. विश्वनाथ सुरेश खडके, ब मधून वंदना संतोष इंगळे, क मधून रंजना विजय वानखेडे तर ड मधून सुनील वामनराव खडके हे भाजपचे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार असून अ मधून हिना युनूस पिंजारी, ब मधून सुमय्या वसीम पिंजारी, क मधून इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे तर ड मधून प्रशांत सुरेश नाईक निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक १८ हा शिवसेनेकडे असून अ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, ब मधून नलुबाई तुळशीराम सोनवणे, क मधून अनिता सुरेश भापसे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये अ मधून रेखा चुडामण पाटील, ब मधून विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे, क मधून निकिता अनिल देशमुख हे शिवसेनेकडून तर ड मधून राजेंद्र झिपरू घुगे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button