चोरीच्या संशयावरुन तरुणाला मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा
यावल तालुक्यातील उसमळी गावातील घटना
यावल प्रतिनिधी
तालुक्यातील उसमळी गावातील शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसमळी गावात आकाश तोताराम बारेला (वय १९) हा तरूण घरीच होता.
त्याचवेळी तेथे रामलाल हरचंद बारेला आणि खुबसिंग शिरताब भिलाला हे दोघे आले. तर शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या रागातून त्यांनी आशाक याच्याशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली. या वेळी दगड मारून आकाशला जखमी केल्याची ही घटना घडली असून या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाथ पोलीस नाईक वसीम तडवी करत आहेत.