जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन* ; *अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती लाभणार !

जळगाव, दि. २९ ऑक्टोबर : शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख श्री. विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
एमआयडीसी परिसरातील मारुती सुझुकी शो-रूमसमोर अजिंठा रोडवर स्थित G-5/1 येथे उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूममुळे अशोक लेलँडचे ‘साथी’ हे वाहन ग्राहकांसाठी प्रथमच उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक, वाहतूकदार व शेतकऱ्यांना ‘साथी’, ‘दोस्त’ आणि ‘बडा दोस्त’ यांसारखी अशोक लेलँडची लोकप्रिय वाहने खरेदी करणे सोपे होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना विक्रीची सेवा दिली जाणार असून एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे स्थित E-8 येथे अशोक लेलँड वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनाचे ओरिजिनल सुटे भाग (Spares) अशा सर्व सुविधा मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अयांश ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी व्यक्त केला आहे.
—




