ब्रेकिंग : जळगांवचे माजी नगरसेवक अनंत जोशी यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव मीडिया प्रतिनिधी:
जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी वय-५० यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच समाजातील मान्यवर आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी वय-५० यांनी शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक, हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवारने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. जिल्हा रुग्णालयात माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, आयुष मणियार, पीयूष कोल्हे, पीयूष मणियार, सरिता माळी, कैलास आप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, जमील देशपांडे, प्रवीण कोल्हे यांच्यासह मित्र परिवार जमला आहे.