जळगाव

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनाआज नवा आदेश जारी, आता योजना अधिक सुलभ

जळगाव दि.12 ( जिमाका) – राज्यातील महीलांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतील स्थान वाढावे यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने दि. १२ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे.त्या सोबतच या योजनेचे यशस्वी अर्ज भरणारे अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.


राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कुटुंबाची व्याख्या
कुटुंब” याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली. अशी केली आहे. अनेकदा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्या सोबतच ज्या महिलांचे पोस्टात बँक खाते असेल त्यांचे पोष्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरणात येणार आहे.त्या सोबतच सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा. PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा DATA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व Aadhaar Authentication यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा.असेही आदेशित करण्यात आले आहे.


राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button