सोसाखळी चोरणारा जेरबंद ; नरडाणा पोलिसांची कारवाई !

सोसाखळी चोरणारा जेरबंद ; नरडाणा पोलिसांची कारवाई !
धुळे (प्रतिनिधी): नरडाणा पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्ध कारवाईचा भाग म्हणून जबरी चोरी प्रकरणातील आरोपीकडून हिस्कावलेल्या सोन्याच्या साखळीचे मुद्देमाल जप्त केले. या साखळीची किंमत १ लाख ८ हजार ९०० रुपये आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस स्टेशन गुन्हा क्रमांक १६४/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ७६, ७९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि वाढीव कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
फरार आरोपी विलास केशव दोरीक (रा. वारुळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याने गुन्ह्यातील साक्षीदार आकाश नागो दोरीक (वय ३३, रा. महादेव मंदिर चौक, वारुळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची साखळी हिस्कावून नेली होती. तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीने ही साखळी धुळे शहरातील इसम उमेश धनराज जडे (वय ४१, रा. घर क्र. ८२, वर्धा नगर, बिलाडी रोड, देवपूर, धुळे) यांच्याकडे दिल्याचे उघडकीस आले.
इसम उमेश जडे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी साखळी आरोपीकडून घेतल्याचे कबूल केले आणि दोन पंचांसमोर ती हजर केली.
जप्त मुद्देमालाची माहिती खालीलप्रमाणे:
१२ इंच लांबीची सोन्याची साखळी (तुटलेल्या स्थितीत) आणि २.५ इंच लांबीचा साखळीचा तुकडा. एकूण वजन: ९ ग्रॅम १०० मिलिग्रॅम. शुद्धता: ८० ते ८२ टक्के (सोनाराकडून काराटोमीटरवर तपासलेली). किंमत: प्रति ग्रॅम ११ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ लाख ८ हजार ९०० रुपये.
या मुद्देमालाची जप्ती पंचनामा करून नरडाणा पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी अधिकारी निलेश मोरे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र महाले, पोहेकॉ ललित पाटील, राकेश शिरसाठ, अनारसिंग पवार, योगेश गिते, रविंद्र मोराणीस, भरत भगरे, पोको अर्पण मोरे, विजय माळी, सचिन बागुल आणि सुरज साळवे यांनी संयुक्तपणे अंमलबजावणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र महाले करीत आहेत.