
मेहरूण तलावात यंदा सर्वपक्षीय समितीकडून रावण दहन सोहळ्याचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात नव्याने स्थापन झालेल्या सर्वपक्षीय रावण दहन उत्सव समितीकडून साजरा होणार आहे.
सर्वपक्षीय नेत्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी विष्णू भंगाळे, उपाध्यक्षपदी नितीन लढा, तर सरिता माळी, सुनिल महाजन, सीमा सुरेश भोळे, कैलास सोनवणे, आशुतोष चुडामण पाटील, कुंदन काळे, अॅड. दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनिल खडके, केतकी पाटील, संजय पवार, शरद तायडे, प्रताप पाटील, गणेश सोनवणे, अनिल अडकमोल आणि अॅड. सुनील पाटील यांचा समावेश आहे.
हा रावण दहन सोहळा गुरुवारी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मेहरूण तलावाजवळील लंका नगरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि रावण दहन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे असतील. रावण दहन उत्सव समितीने जळगावकरांना कुटुंबासह या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.