
किन्नरास मारहाणप्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन
भुसावळ प्रतिनिधी ;- येथील रहिवासी आम्रपाली उर्फ अश्फाक किन्नरास अन्य किन्नर व काही पुरुषांनी मारहाण केल्याबाबत जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपीवर कारवाई न झाल्याने शमीभा पाटील व आम्रपाली किन्नर यांनी जळगावात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदमात म्हटले आहे की, भुसावळ ते जामनेर रस्त्यावरील विशाल लॉन्ससमोर भुसावळच्या आश्विनी किन्नर, सारीका किन्नर, चमेली किन्नर उर्फ दया, राहूल उर्फ रत्ना किन्नर, दुर्गेश उर्फ दुर्गा किन्नर, गोट्या उर्फ चुटकी किन्नर, भावेश उर्फ भावना किन्नर यांनी आम्रपालीस जबर मारहाण केली होती. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करुन ही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर ते पुन्हा आम्रपालीस धमकी देतात व भुसावळ शहरात भिक्षुकीसाठी विरोध करतात. त्यामुळे या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई न्याय व सुरक्षितता मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.