
विनापरवाना सागवान पलंग व सोफासेटची वाहतूक करणारे वाहन पकडले
रावेर वनपरिक्षेत्रच्या गस्तीपथकाची सावदा गावाजवळ कारवाई
जळगाव प्रतिनिधी
विनापरवाना एका वाहना मधून अवैधरीत्या सागवान पलंग आणि सोफासेट असा मुद्देमाल घेऊन जाताना रावेर वनपरिक्षेत्र च्या गस्ती पथकाने मौजे सावदा गावाजवळ 26 जानेवारी च्या रात्री एक वाजेच्या सुमारास वाहन पकडून सुमारे एक लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास रावेर सावदा रस्त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे सावदा गावाजवळ टाटा कंपनीचा एम एच 04 एफ जे 3248 क्रमांकाच्या वाहनाला थांबवले असता यात सागवान चे चार पलंग आणि एक सोफा सेट आढळून आला. याबाबत वाहनचालक गणेश भिमराव खैरनार वय 27 रा. जळगाव याला परवाना बाबत विचारले असता त्याने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. या सागवानी साहित्याची 64,500 इतकी किंमत असून मालवाहतूक करणारे वाहनाची किंमत एक लाख 26 हजार रुपये असा एकूण एक लाख 90 हजार पाचशे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे वन संरक्षक निनू सोमराज, यावल वनविभाग उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी आर आर सदगीर, चोपडा सहायक वन संरक्षक प्रथमेश हडपे, सहाय्यक वनसंरक्षक यावल वन विभाग समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहावे अजय बावणे, रवींद्र सोनवणे, सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे आदींच्या पथकाने केली,